खंडोबाची जिवंत आठवण

चंदनपुरी गावांतील काही जिवंत आठवणी आहेत. खंडोबाच्या मंदिरापासून २-३ मिनिटाच्या अंतरावर उत्तरदिशेस गेल्यावर एक खुंटा (गुरे बांधण्यासाठी लागणारी कडी) आहे. तसेच एक स्वयंभू शिवलिंग आहे. खंडोबा महाराज या खुंट्याला आपला घोडा बांधत असत. खंडोबाच्या घोडयाच्या टापा (पायांचे ठसे) आजही नदीतल्या खडकांत जिवंत स्वरुपात पहावयास मिळतात. ज्या ठिकाणी लेंडी पार होता, त्या ठिकाणी आजचे बानुचे मंदिर तयार झाले आहे. बानुच्या न्हाणीचेही काही भाग पहायला मिळतात.

ज्या ठिकाणी खंडेराव महारांजांनी बानुच्या मेंढ्या आपटल्या होत्या, त्या ठिकाणी (निमडोहा जवळ) हे स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवलिंग, खुंटा व न्हानीचे भाग खंडेराव व बानुच्या चंदनपुरीतील स्मृतींना उजाळा देतात.
|| येळकोट येळकोट जय मल्हार ||