श्री क्षेत्र चंदनपुरी

चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. महाराष्टात दुस-या क्रमाकाचे देवस्थान आहे.म्हणुन दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.
खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईचे सौदर्याला भूलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाई चे घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्या वर चाकरी केली होती व प्रेम बळाने वश करून लग्न लावून जेजुरीस आणले अशी जनश्रुती आहे. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तिच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्या मधील मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण नाशिक-मालेगाव मार्गावर मालेगावचे अलीकडे चंदनपुरी फाट्या पासून ३ किमी अंतरावर आहे गिरणा नदी काठी असलेल्या या गावातील गाडी रस्त्याने मंदिरा पर्यंत जाता येते.
मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत.मंदिराचे पुर्वद्वार प्रमुख असून या द्वारा बाहेर दीपमाळ पायारीमार्ग व मार्गाचे बाजूने चोथरे आहेत.
पूर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वभिमुख मुख्य मंदिर दिसते मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपात जाण्यासाठी पूर्व द्वारास काही पायऱ्या आहेत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगतात.
पूर्वभिमुख गर्भगृहात एका पूर्वभिमुख कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मुर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात या पूर्वीच्या मुर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या.या मुर्ती समोर शिवलिगं आहे.
मुख्य मंदिराचे मागे कोटाचे पश्चिम दरवाज्याचे दक्षिण बाजूस एका कोनाड्यात शेदूर चर्चित स्थान आहे.
मंदिराचे उत्तर बाजुस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहे.
चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाई चे छोटेसे मंदिर आहे मंदिरातील मुर्ती संगमरवरी आहे, पौष पौर्णिमेस मोठी यात्रा भरते उत्सव मुर्ती चा पालखी सोहळा या दिवशी असतो. पुढे दहा दिवस यात्रेची गर्दी असते.