चंपाषष्ठी हा खंडोबाचा कुलधर्माचा दिवस. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून पुढे पाच दिवस त्याचे नवरात्र असते. षष्ठीच्या दिवशी कुलधर्म होतो.खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत असते, त्याच्या घरी देव्हाऱ्यात त्याचा टाक असतोच असतो. षष्टीला महानैवेद्य असतो. त्यात जोधंळे शिजवून दहीमीठ घालुन केलेला डोंबरा असतो. शिवाय कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसुन हे पदार्थ लागतात. त्याच प्रमाणे गव्हाच्या ओंब्या, हुरडा, तीळ, गुळ हे पदार्थ फुलवात लावतात.