तीर्थक्षेत्र व चंदनपुरीतील इतर धार्मिक स्थळे

चंदनपुरी तीर्थक्षेत्र महाराष्ट्राची लोकप्रिय लोकदेवता खंडोबाचे जेजुरीनंतरचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून श्री क्षेत्र चंदनपुरी नावारूपाला येत आहे. चांदणपुरीच्या खंडेराव मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येवरून हे लक्षात येईलच. दोन दशकापूर्वी केवळ बैलगाडी हेच महत्वाचे वाहन असल्याने केवळ यात्रौत्सव अथवा कुळधर्मासाठी खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आज वर्षभरात कधीही दर्शनाला येतात.प्रत्येक रविवारी हजारो भाविक खंडोबाचे दर्शन घेतात. आधुणूक काळात माणसाला जरी नित्याच्या जीवनक्रमातून वेळ काढु शकत नसला तरी कुळधर्म, यात्रा, स्नेहीजन यांच्यामुळे चंदनपुरीच्या खंडोबाच्या दर्शनाचा योग मात्र जुळून येतो यात शंका नाही.चंदणपुरीत मुक्कामासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असली तर जवळच असलेले शहराचे ठिकाण आणि वाहतुकीच्या झालेल्या मुबलक सोयी यामुळेही भाविक दर्शन घेऊन परतीच्या प्रवास करतात. आज भाविकांसाठी सुरु असलेल्या सोयी भविष्यातील भाविकांची सोय बघता कमी पडतील यात शंका नाही.

चंदनपुरीतील इतर धार्मिक स्थळे मालेगाव-नांदगांव रस्त्यावर चांदणपुरीपासून १ किलोमीटर अंतरावर स्वयंभू श्री मडकी महादेव मंदिरही पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. तसेच श्री बिरोबा महाराजांच्या स्थळामुळेही चंदनपुरी एक धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. गिरणा-मोसम तीरावर त्रिवेणी मडकीनाला महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी अनेक भाविक दर्शनाला येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि ऋषीपंचमीला भाविकांची तर दाटी असते. श्री बिरोबा महाराजांचे चांदणपुरीतील स्थळाला प्रत्येक रविवारी, नवरात्रोत्सव निघणाऱ्या पालखिला अनेक भाविक हजेरी लावतात. मडकी महादेव मंदिरा पाठोपाठ मुंबई-आग्रा महामार्गावरील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरही शिवभक्तामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यात श्री क्षेत्र खंडेराव मंदिरात होणारया अखंड हरीनाम साप्ताह व पारायण सोहळ्यात अनेक नामवंत कीर्तनकार मौलिक मार्गदर्शन करतात.