श्री क्षेत्र चंदनपुरी यात्रा उत्सव

चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभले आहेत. महाराष्टात दुस-या क्रमाकाचे देवस्थान आहे.म्हणुन दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.
कोणत्याही देवाच्या जितक्या यात्रा भरत नाहीत, तितक्या यात्रा खंडोबाच्या भारतात. चैत्र, पौष व माघ महिन्यात शुद्ध १२ ते वद्य १ पर्यंत पाच सहा दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते दशमी (दसरा) हे सहा दिवस, शिवाय सोमवती अमावस्येला ठिकठिकाणी मोठया यात्रा भरतात. मणिमल्लंचा वध करण्यासाठी श्री शंकरानेखंडोबाचा अवतार घेतलेला आहे.

खंडोबा सारखा लोक संग्रह फार थोडया देवतां भोवती झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या समन्वयाचे एक प्रतिक म्हणून या देवतांचा गौरव करणे गरजेचे आहे. समाजातल्या सर्व जाती धर्मामध्ये लोकप्रिय असणारे खंडोबा हे कुलदैवत अशा प्रकारे सर्व समाजात महत्वाचे ठरते. महादेव शंकरांनी ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या असुरांचा नाश करण्यासाठी खड्ग (तलवारी सारखे शस्र) हाती घेऊन असुरांचा नाश केला म्हणून महादेव शंकरांला खंडेराव (खड्ग धारण करणारा) असे म्हणतात.